Solor Rooftop Subsidy Yojana: सोलर रूफटॉप वर सबसिडी मिळण्यासाठी सुवर्ण संधी, अशाप्रकारे करा त्वरित अर्ज

Solor Rooftop Subsidy Yojana: भारत सरकारच्या अंतर्गत सुरू केलेल्या सोलार रूफटॉप सबसिडी योजनेच्या माध्यमातून गरीब लोकांना खूप फायदा मिळणार आहे. जर आजच्या युगात पाहिलं तर विज बिल दर महिन्याला खूप जास्त येत आहे आणि यामुळे गरीब कुटुंबाचे लोक खूपच त्रस्त झालेले आहे. जास्त विज बिलामुळे सामान्य कुटुंबाची आर्थिक अडचण दिवसां न दिवस वाढत जात आहे. या व्यतिरिक्त काही भागांमध्ये घरच्या कामांमध्ये खूप अडथळे निर्माण होतात.

या सर्व समस्यावर आता केंद्र सरकारने एक उपाय काढलेला आहे. उपाय हाच आहे की सरकारने या गरीब आणि सामान्य कुटुंबीयांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचं नाव सोलर रूफटॉप सबसिडी योजना (Solar Rooftop Subsidy Yojana) आहे. या स्कीम च्या माध्यमातून कुटुंब आपल्या घराच्या छतावर सोलार बसून स्वतःची वीज तयार करू शकतात. या योजनेची विशेषता ही आहे की तुम्हाला जास्त काळ वीज बिल भरायची गरज पडणार नाही.

नेमकी काय आहे सोलर रूफटॉप योजना?

सोलर रूफटॉप सबसिडी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे आणि ही गरीब लोकांसाठी खूप महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश हा आहे की जो व्यक्ती दर महिन्याला विजेचे बिल भरू शकत नाही ते या योजनेसाठी अर्ज करून सोलर रूफटॉप योजनाचा लाभ घ्या आणि त्यानंतर हे सोलर रूफटॉप घराच्या छतावर बसवून द्या.

जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या घराच्या छतावर सोलर बसवून घेईन त्यानंतर त्याला विजेचे बिल भरायची गरज पडणार नाही. कारण आता तो व्यक्ती या सोलार च्या माध्यमातून वीज तयार करू शकेल. त्यामुळे बिल भरण्याचा कोणताच प्रश्न उत्पन्नच होणार नाही आणि या योजनांचा हाच खरा उद्देश आहे.

या योजनेच्या अंतर्गत किती सबसिडी मिळते?

आता आपण पाहू की या योजनेच्या अंतर्गत लोकांना किती टक्केवारी सबसिडी मिळते. जर कोणता अर्जदार 1 किलो वॅट ते 3 किलो वॅट पर्यंत सोलर घेत असेल तर त्यांना सरकारच्या माध्यमातून 40% ते 50 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. जर कोणती व्यक्ती 3 किलो वॅट ते 10 किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल बसवून घेत असेल तर त्यांना सरकारकडून 20% सबसिडी दिली जाते.

पण जो व्यक्ती 10 किलो वॅट नाही तर त्यापेक्षा जास्त सोलर पॅनल साठी अर्ज करत असेल तर त्यांना 1 टक्का सुद्धा सबसिडी मिळणार नाही. उदाहरणार्थ जर कोणी 3 किलोमीटर सोलर पॅनल आपल्या छतावर बसवला आणि त्याची एकूण किंमत कमीत कमी 90,000 हजार रुपये असेल तर सरकारच्या 40% हिशोबाने त्या व्यक्तीला 36 हजार रुपये सबसिडी मिळते.

पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही ह्या अटी पूर्ण करू शकलात तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. सर्वप्रथम अर्जदार भारताचा नागरिक असावा व त्यांचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे आणि अर्जदाराच्या घराच्या छतावर सोलर बसविण्याकरिता थोडीशी जागा असणे खूप महत्त्वाचे आहे. कमीत कमी 10 स्क्वेअर मीटर जागा पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना तुमच्याजवळ काही आवश्यक कागदपत्रे होणे खूप महत्त्वाचे आहे. अर्जदारांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, छताचा फोटो, बँक पासबुक, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो होणे खूप महत्त्वाचे आहे. हे जर कागदपत्र नसेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना सर्वप्रथम solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला राज्य आणि वितरण कंपनी निवडायची आहे आणि त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि विज कनेक्शन नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी च्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म भरायचा आहे.

यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, सोलर पॅनल ची क्षमता आणि सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे आणि खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. यानंतर काही अधिकारी तुमच्या घरी इन्स्पेक्शन साठी येतील. मग तुम्हाला मान्यता मिळाल्यानंतर सोलर पॅनल इंस्टॉलेशन सुरू होईल. जेव्हा पॅनल बसवल्यानंतर नेट मीटरिंग ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे नंतर तुमच्या खात्यावर सबसिडी जमा होईल.

या दिवशी येणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता, येथे जाणून घ्या वेळ आणि तारीख

Leave a Comment