ISRO VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 पदांसाठी नवीन भरती झाली सुरु, त्वरित करा अर्ज

ISRO VSSC Bharti 2025: जे उमेदवार नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण इतक्यातच विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन करावा लागणार आहे.

तुमच्या माहितीसाठी या भरतीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ही वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी ठेवलेली आहे. जर तुम्ही चांगली नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम नोकरी आहे. उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 2 जून 2025 पासून सुरू करू शकतात.

रिक्त पद

टेक्निशियन बी या पदांसाठी 56 पद राखीव ठेवलेले आहे. ड्राफ्ट्समन बी या पदांसाठी 7 पदे रिक्त ठेवलेले आहे. त्याचबरोबर फार्मासिस्ट ए यांच्यासाठी 1 पद निर्धारित केलेले आहे. टेक्निकल असिस्टंट साठी 76 पद ठेवलेले आहे. याव्यतिरिक्त सायंटिफिक असिस्टंट साठी 5 पद राखीव ठेवलेले आहे आणि लायब्ररी असिस्टंट ए साठी 2 पद ठेवलेले आहे. अशाप्रकारे एकूण पदांची संख्या 147 आहे आणि या भरतीसाठी भारतातील कोणीही अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

टेक्निशियन बी पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी उत्तीर्ण, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टर्नर, फिटर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रोप्लेटर, वेल्डर, मेकॅनिक मोटर, वेहिकल मेकॅनिक, डिझेल ट्रेड, मेकॅनिक रेफ्रिजरेटर, फोटोग्राफर आणि कार्पेंटर ठेवलेली आहे. याच बरोबर ड्राफ्ट्समन बी पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावा वर्ग पास आणि आयटीआय पास होणं खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय फार्मासिस्ट ए या पदांसाठी सुद्धा दहावी पास आणि डी फार्म शैक्षणिक योग्यता ठेवलेली आहे.

टेक्निकल असिस्टंट पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल प्रोडक्शन, कम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेन्शन मध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे. सायंटिफिक असिस्टंट च्या पदासाठी बीएससी फिजिक्स किंवा केमिस्ट्री मध्ये डिग्री पाहिजे. याव्यतिरिक्त लायब्ररी असिस्टंट ए पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि ग्रंथालय विज्ञान मध्ये पदवी असणं खूप महत्त्वाचं आहे.

वयोमर्यादा

टेक्निशियन बी, ड्राफ्ट्समन बी आणि फार्मासिस्ट ए या पदांसाठी वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष पाहिजे. याच बरोबर टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, आणि लायब्ररी असिस्टंट या पदासाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष ठेवलेली आहे.

अर्ज शुल्क

टेक्निशियन बी, ड्राफ्ट्समन बी आणि फार्मासिस्ट ए या पदांसाठी आवेदन शुल्क पाचशे रुपये ठेवलेलं आहे. या पदासाठी जनरल आणि ओबीसी यांना 400 रुपये पुन्हा रिफंड केल्या जाईल. याशिवाय टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, आणि लायब्ररी असिस्टंट या पदांसाठी 750 अर्ज फी ठेवण्यात आलेली आहे.

वेतन मान

टेक्निशियन बी, ड्राफ्ट्समन बी आणि फार्मासिस्ट ए पदांसाठी वेतन मान 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये प्रति महिना ठेवलेलं आहे. टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, आणि लायब्ररी असिस्टंट या पदांसाठी वेतन मान 44 हजार 900 रुपये ते 1 लाख 42 हजार रुपये ठेवलेलं आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला इस्रोच्या isro.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जायचं आहे. नंतर तुम्हाला होम पेजवर VSSC Vacancy 2025 या लिंक वर क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर या भरतीचा अर्ज फॉर्म ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला जेवढी माहिती विचारली असेल तेवढी माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरायची आहे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे. मग तुमच्या श्रेणी अनुसार अर्ज शुल्क भरायचा आहे आणि खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता.

एसएससी स्टेनोग्राफर भर्ती 2025 की नोटिफिकेशन हुई जारी, यहां से करें डायरेक्ट आवेदन

Leave a Comment