Gharkul Yojana 2025: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भारतातील सर्व गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिला जातो. ज्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही व जो व्यक्ती त्याच्या घरामध्ये राहतो अशा व्यक्तींना योजनाचा लाभ केंद्र सरकार द्वारा दिला जात असतो. काही राज्यात घरकुल योजना राबवल्या जातात. म्हणजे ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालेला नाही अशा लोकांसाठी राज्य सरकार योजना सुरू करते.
ज्या लोकांचं स्वप्न चांगल्या घरात राहण्याचा आहे त्यांच्यासाठी आता सुवर्णसंधी आहे. ते लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात. सध्या आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घरकुल योजनेची नवीन यादी कशी पहावी हे पाहणार आहोत. ज्या ज्या लोकांनी काही दिवसांपूर्वी घरकुलासाठी अर्ज भरला होता ते लोकं ही यादी पाहू शकतात.
काय आहे घरकुल योजना?
घरकुल योजना ची सुरुवात केंद्रीय सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि ही योजना सध्या गरीब कुटुंबासाठी फार फायद्याची ठरत आहे. आतापर्यंत करोडों कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. तर तुम्ही पाहू शकता की या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती सुविधा मिळते. लाभार्थी कुटुंबियांना नवीन घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते.
तसं जर पाहिलं तर या योजनेचं उद्दिष्ट हेच आहे की 2025 पर्यंत सर्व गरीब कुटुंबाला नवीन घर उपलब्ध करून देणे. विशिष्ट म्हणजे ग्रामीण भागातल्या कुटुंबासाठी ही खूप फायद्याची गोष्ट आहे. या योजनेसाठी तेच कुटुंब अर्ज करू शकतात ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही किंवा ते अत्यंत जुन्या घरामध्ये आता सुद्धा राहतात.
अनुदान किती मिळेल?
तुमच्या मनात शंका असेलच की घरकुलासाठी सरकार कडून किती अनुदान मिळते. तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान मिळते. जे तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये दिले जाते आणि खास गोष्ट ही आहे की ही रक्कम लाभार्थ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यांमध्ये जमा होती. सध्या महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे घरकुलांच्या अनुदानामध्ये रक्कम वाढवावी याचा प्रस्ताव मांडलेला आहे.
परंतु अजून पण प्रस्तावाचं उत्तर आलेलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगत आहे की या अनुदानाची जी रक्कम असती ती तुम्हाला हप्त्यामध्ये मिळत असती. लाभार्थ्यांना पहिला हप्ता घराचा पाया बांधल्यानंतर मिळतो तर दुसरा हप्ता छताचे पूर्ण काम झाल्यावर मिळतो आणि राहिलेला शेवटचा हप्ता संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर मिळतो.
पात्रता
ज्यांना कोणालाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांची पात्रता या योजनेच्या अनुसार पाहिजे. म्हणजे या योजनेचा लाभ त्या कुटुंबांना मिळतो ज्यांचे वार्षिक उत्पन्न खूप कमी आहे. तसं जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या कुटुंबांना प्राधान्य दिलं जातं. जो व्यक्ती अर्ज करेल त्यांच्या नावावर पक्क घर नसावं. अर्जदाराचे घर अत्यंत जुनं नाहीतर राहणे योग्य नसलं पाहिजे. अर्जदार गावात किंवा शहरात राहणारा असावा. या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक कुटुंबांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळ आधार कार्ड, राशन कार्ड, ग्रामपंचायत कडून मिळणारे रहिवासी प्रमाणपत्र, जॉब कार्ड, मनरेगा कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ पाहिजे.
अर्ज कसा करायचा?
घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करू शकता. ऑफलाइन च्या माध्यमातून अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन घरकुल योजनेची चौकशी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्ज फॉर्म देतील. फॉर्ममध्ये तुम्हाला जेवढी माहिती विचारली तेवढी तुम्हाला लिहायची आहे आणि त्यासोबतच वरील दिलेले कागदपत्र जोडायचे आहे. त्यानंतर कागदपत्रांसह फॉर्म ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता बदलणार शाळा आणि कॉलेजचे नियम, येथे पहा नवीन GR
ऑनलाइन प्रक्रिया मध्ये तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर घरकुल योजनेचा विभाग शोधायचा आणि नवीन अर्ज करण्याचा प्रकल्प निवडायचा. मग तुमच्या समोर प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये जेवढी माहिती तुम्हाला विचारली तेवढी माहिती बरोबर भरायची. नंतर आवश्यक कागदपत्रांना ऑनलाइन अपलोड करायचे आणि खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचे. या प्रकारे तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता.
सोलर रूफटॉप वर सबसिडी मिळण्यासाठी सुवर्ण संधी, अशाप्रकारे करा त्वरित अर्ज