Gharkul Yojana Subsidy: घरकुल योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. या योजनेला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. या योजनेचा लाभ त्या लोकांना दिला जातो, ज्या लोकांजवळ स्वतःचं घर नाही. या व्यतिरिक्त जे लोकं त्याच्या घरामध्ये राहतात. तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर आतापर्यंत करोडों कुटुंबीयांनी लाभ घेतलेला आहे. नवीन घर बांधण्याकरिता लाभार्थी व्यक्तींना 1 लाख 20 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. पण एवढ्या पैशांमध्ये बरोबर घर बांधणं सुद्धा होत नाही.
हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची घोषणा केली आणि या घोषणांमध्ये त्यांनी सांगितले की पात्र व्यक्तींना आता 1 लाख 20 हजार रुपये च्या व्यतिरिक्त आणखी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयासाठी ऑफिशियल जीआर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. परंतु हे अनुदान सर्वच लाभार्थ्यांना एकसारखं मिळणार नाही. याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली माहिती वाचू शकता.
योजनेचा उद्दिष्ट
तसं आपल्याला माहित आहे की पीएम आवास योजना हा केंद्र सरकारचा सर्वात मोठा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून खूप जणांना नवीन घर मिळालेले आहे. आता सध्या या योजनेचा दुसरा टप्पा अंमलात आलेला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्य सरकारने आवास योजनेला राज्यामध्ये थोडं जास्त बळकट देण्यासाठी अतिरिक्त पन्नास हजार रुपयाची व्यवस्था केलेली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर भारत सरकारच्या योजने बरोबर काही महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या ग्रामीण घरकुल योजनांचाही अतिरिक्त अनुदान वाढीमध्ये समावेश केलेला आहे. यामुळे महाराष्ट्र मध्ये जेवढे गरजू लोक आहे यांना आणखी फायदा मिळणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये अनुदान वाटप
सूत्रांच्या माहिती अनुसार प्रधानमंत्री आवास योजना च्या प्रत्येक लाभार्थ्याला आता अनुदानाची रक्कम वाढवून 50 हजार रुपये केलेली आहे. आता लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार आणि आणखी अतिरिक्त पन्नास हजार रुपयाची मदत मिळणार आहे. 50 हजार रुपयाची रक्कम जी आहे ती दोन भागांमध्ये वाटप केली जाणार आहे. पहिले 35 हजार रुपये घराच्या बांधकामासाठी देण्यात येणार आहे.
यामध्ये तुम्ही भिंती, फरसबंदी आणि छप्पर या मधलं कोणतंही काम करू शकतात. राहिलेले 15000 रुपये या रकमेचा वापर तुम्हाला घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी करायचा आहे. मिळालेल्या माहितीच्या माध्यमातून सांगायचं तर 15 हजार रुपयाची रक्कम पीएम सूर्य घर योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त दिली जाणार आहे.
पीएम आवास मध्ये पीएम सूर्यघर योजनेचा समावेश
तसं जर पाहिलं तर लाभार्थी व्यक्तींना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 1 किलो वॅट क्षमतेचं सौर ऊर्जा यंत्रणासाठी सरकारकडून जवळपास 30 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
पण आता सरकारकडून लाभार्थ्यांना एकूण सौर ऊर्जा अनुदान 45000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच केंद्र सरकारकडून 30 हजार रुपयाची मदत मिळणार आहे व त्याचबरोबर राज्य सरकारकडून 15000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे.
पात्रता आणि अटी
जर तुम्हाला 50 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांना घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्र बसवणे आवश्यक आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी छतावर सौर ऊर्जा यंत्र नाही बसवले. त्यांना 50 हजार रुपये मधले 15 हजार रुपये मिळणार नाहीत.
फक्त तुम्हाला बांधकामासाठी 35 हजार रुपयेच मिळतील. लक्षात घ्या हे जे अतिरिक्त अनुदान आहे हे फक्त 2024-25 आर्थिक वर्षातील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठीच आहे.
आवश्यक कागदपत्रे
नवीन अर्ज करणाऱ्या लोकांना सांगण्यात येते की जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यापूर्वी तुम्हाला तुमची पात्रता तपासायची आहे. जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकाल.
सध्या या योजनेसाठी ज्या कोणी लोकांनी अगोदर नोंदणी केलेली आहे त्याच व्यक्तींना प्राधान्य दिलं जाणार आहे. अर्जदारांकडे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि जमिनीची कागदपत्रे असणं खूप महत्त्वाचं आहे.