Indian Coast Guard Bharti 2025: सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी, तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलाच्या माध्यमातून आताच 630 पदांसाठी नोटिफिकेशन प्रकाशित केलेली आहे. जे विद्यार्थी आपलं करिअर इंडियन कोस्टच्या नोकरीमध्ये करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची व तसेच महत्त्वाची बातमी आहे. या नोकरीची चांगली गोष्ट हीच आहे की या भरतीसाठी डिप्लोमा वाले, दहावी वर्ग आणि बारावी वर्ग पास असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

इतकंच नाही तर विद्यार्थी स्वतः अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकतो. अर्ज करण्याची तारीख 11 जून 2025 ठेवलेली आहे. याचबरोबर अर्जदार 25 जून 2025 पर्यंतच आपले ऑनलाईन अर्ज भरू शकतात. तुम्ही नाविक जीडी, यांत्रिक, मेकॅनिकल आणि विद्युत या पदांसाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता.

पदाचे नाव आणि पद संख्या

कोस्ट गार्ड अँड्रॉइड पर्सनल टेस्ट 01/2026 आणि 02/2025 बॅच  पदाचे नाव आणि तपशील तुम्हाला खालील दिलेली आहे. सर्वप्रथम नाविक जीडी या पदासाठी 260 पद राखलेले गेले आहे.

याचबरोबर यांत्रिक या पदासाठी पोस्ट ची संख्या 30 ठेवलेली आहे. विद्युत पदांसाठी 19 पद, मेकॅनिकल पदांसाठी 11 पद, नाविक जीडी चे 260 पद आणि नाविक डीबी चे 50 पद ठेवलेले आहे. एकूण पोस्टची संख्या 630 आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय तटरक्षक दलाच्या अनुसार सांगायचे तर नाविक जीडी पदांसाठी शैक्षणिक पात्रता गणित आणि भौतिकशास्त्र मध्ये बारावी क्लास उत्तीर्ण ठेवलेली आहे. याचबरोबर नाविक डीबी या पदांसाठी शैक्षणिक योगिता दहावी उत्तीर्ण ठेवलेली आहे.

यांत्रिक या पदासाठी दहावी वर्ग पास, 03-04 वर्षीय इंजीनियरिंग डिप्लोमा‌ किंवा दहावी वर्ग आणि बारावी वर्ग पास व त्याचबरोबर दोन-तीन वर्षीय इंजीनियरिंग डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा

तटरक्षक दलात जो विद्यार्थी अर्ज करणार आहेत, त्यांचे वय नियमानुसार असणे खूप आवश्यक आहे. अर्जदारांचं कमीत कमी वय 18 वर्ष व जास्तीत जास्त वय 22 वर्ष असलं पाहिजे. जे विद्यार्थी नाविक जीडी या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यांचे वय एक ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 च्या मधील असणे खूप महत्त्वाचे आहे.

याव्यतिरिक्त नाविक डीबी या पदांसाठी उमेदवारांचे वय 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2018 पर्यंत पाहिजे. याचबरोबर यांत्रिक पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचं वय एक मार्च 2004 ते 1 मार्च 2008 च्या मधात असलेलं पाहिजे. एससी आणि एसटी या विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सूट दिलेली आहे. ओबीसी यांना 3 वर्षाची सूट दिलेली आहे.

अर्ज शुल्क

जनरल आणि ओबीसी या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरायचे 300 रुपये घेतले जाणार आहे. म्हणजेच सरकारने या विद्यार्थ्यांसाठी एवढी फी ठेवलेली आहे. याव्यतिरिक्त एससी आणि एसटी च्या श्रेणीमध्ये जे अर्जदार येतात त्यांना अर्ज फी भरायची काम नाही. यांना मोफत फॉर्म भरण्याची संधी सरकार द्वारा मिळालेली आहे.

महत्त्वाच्या तारखा

या भरतीची नोटिफिकेशन 11 जून 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे आणि अर्ज भरायची तारीख सुद्धा 11 जून 2025 आहे. अर्ज भरायची शेवटची तारीख 25 जून 2025 ठेवलेली आहे. सीबीटी परीक्षेची तारीख सप्टेंबर 2025 ठेवलेली आहे.

आणि हो अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. तुम्हाला प्रवेश पत्र परीक्षा च्या दोन-तीन दिवसाआधी वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षा केंद्र तुम्हाला परीक्षेच्या 10 दिवसा अगोदर सांगितले जाईल.श

Indian Coast Guard Bharti 2025 अर्ज कसा करावा?

अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindiancoastguard.cdac.in या अधिकारी वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर New Registration विकल्प दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती बरोबर भरायची आहे.

नंतर तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करायचे आहे. आता विद्यार्थी आपल्या श्रेणी अनुसार अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. अर्जदार परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग व यूपीआयच्या माध्यमातून भरू शकतात. हे झाल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकता.

Leave a Comment