Ladki Bahin Yojana Beneficiary List: महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय योजना ज्याचं नाव माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब व सामान्य महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ जवळपास 2 कोटी 59 लाख महिला घेत आहे.
महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत बऱ्याच जणांना पैसे मिळालेले आहेत. पण सध्या सरकार पुन्हा पडताळणी सुरू करत आहे यामुळे खूप साऱ्या मुलांच्या मनात चिंता दिसून येत आहे. पडताळणी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार द्वारा एक लाभार्थी सूची प्रकाशित केली जाईल. जर तुमचं नाव त्या सूचीमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
ही योजना ठरली लोकप्रिय
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही खूप लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाती आणि या स्कीमची खासियत ही आहे की योजनेचा पैसा डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जातो. या योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 पासून केली आहे.
पण तुम्हाला माहित आहे का स्त्रियांना दर महिन्याला जो पैसा दिला जातो. त्यासाठी सरकारला दर महिन्याला 385 कोटी रुपयांचा खर्च लागतो. इतकंच नाही जेव्हा निवडणुकीची वेळ आली होती. तेव्हा सरकारनं या पैशांमध्ये वाढ करून 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती आणि पुढे हीच रक्कम पुन्हा वाढवून 3 हजार रुपये वाढण्याचे आश्वासन महिलांना दिले होते. परंतु आज पर्यंत सुद्धा या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
पडताळणीची प्रोसेस झाली सुरू
गेल्या काही महिन्यात अशा काही महिलांना लाभ मिळाला आहे. ज्या महिला सरकारी पदावर कार्यरत आहे. त्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे व त्यांच्या घरी चार चाकी गाडी आहे अशा महिलांना सुद्धा लाभ मिळाला. म्हणजे हे एक प्रकारचं सरकारसोबत फ्रॉड झालं. म्हणून सरकारने या योजनेअंतर्गतील सर्व महिलांची पुन्हा पडताळणीची प्रोसेस सुरू केलेली आहे. या पडताळणीमध्ये त्याच महिलांना लाभ दिला जाईल.
ज्या खरोखर या योजनेसाठी पात्र आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 60 वर्षाच्या मधात असलं पाहिजे. इतकंच नाही तर महिला महाराष्ट्र राज्याची निवासी पाहिजे आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असलं पाहिजे. महिला जवळ कोणतीही सरकारी नोकरी नसावी आणि महिलाच्या कुटुंबातील कोणीही वर्तमान आणि माजी खासदार, आमदार नसावे.
महत्त्वपूर्ण कागदपत्रे
महिलांना सांगण्यात येते की जर तुम्हाला या योजनेचा भरपूर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे असणं खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये तुमच्याजवळ आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि बँकेचे पासबुक होणं खूप गरजेचं आहे.
अर्ज कसा करावा
महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी जायचं आहे आणि इथे तुमचा अर्ज भरायचा आहे. याव्यतिरिक्त महिला नारी शक्ती मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा अर्ज करू शकतात. याशिवाय सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आणि वार्ड ऑफिस येथे सुद्धा देखील तुम्ही अर्ज करू शकता. लक्षात राहू द्या सध्या कोणतीही महिला अर्ज करू शकत नाही कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पडताळणी सुरू आहे.
लाभार्थी सूची याप्रकारे करा चेक
ज्या महिलांना लाभार्थी सूची चेक करायची असेल त्यांनी सर्वप्रथम ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. नंतर तुम्हाला होम पेजवर Approved Applicants List ही लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही लाभार्थी सूची मध्ये तुमचं नाव चेक करू शकता.